Vasant Panchami Wishes Quote In Marathi
सरस्वतीच्या पूजनाने आपण ज्ञानसमृद्ध व्हावे ही सदिच्छा
वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
Tags: Smita Haldankar
आला वसंत ऋतु आला
वसुंधरेला हसवायाला
सजवित नटवित लावण्याला
आला, आला वसंत ऋतु आला
रसरंगाची करीत उधळण
मधुगंधाची करीत शिंपण
चैतन्याच्या गुंफित माला रसिकराज पातला
वृक्षलतांचे देह बहरले
फुलाफुलांतून अमृत भरले
वनावनांतून गाऊ लागल्या पंचमात कोकिळा
व्याकुळ विरही युवयुवतींना
मधुर काल हा प्रेममिलना
मदनसखा हा शिकवी रसिका शृंगाराची कला