Saptpadi Ukhane
सप्तपदी उखाणे
“जेजुरीचा खन्डोबा तुळ्जापुरची भवानी ….रावाची आहे मी अर्धागीनी”
“चिमुकल्या ओढ्याची झाली विशाल नदी, ….. च्या बरोबर केली सप्तपदी”
“कोणत्याही रुढी परंपरेत आहे विज्ञानाचे धागेदोरे, …सह घेतले मी सप्तपदीचे फेरे”
“कामाची सुरवात होते श्रीगणेशापासुंन ……..नाव घेयला सुरवात केली आजपासून”
“अंगावरच्या शेलारीला बांधुनी त्यांचा शेला, ….चे नाव घेण्यास आज शुभारंभ केला”
“फुल आहे गंध भाव आहे अंतरी, …सह चालले सातपावलांवरी”
“नयनाच्या आकाशात उमलते शुक्राची चांदणी तुमच्याच आशीर्वादाने बाग फुलवित …… च्या अंगणी”
“देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे, …. चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे”
“तु्ळजा भवानीचि क्रुपा आणि तिरुपतीचा आशिर्वाद माहेरचे निरान्जन आणि सासरची फूलवात ….रावान्चे नाव घेउन करते संसाराला सूरूवात”
“ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने डोळे दिपले जगाचे, …सहसंसारात सुखी होण्यासाठी मागणे आहे तुमच्या आशीर्वादाचे.”
“मंगल झाली प्रभात, विहंग उडाले गात …रावांच्या हाती दिला हात करायला जन्मोजन्मीची साथ “
“हिमालाय पर्वतावरा बर्फाच्या राशी, …चे नाव घेते लग्नाच्या दिवशी”
“साता जन्माच्या जुळल्या गाठी, …रावांच नाव घेते चालताना सप्तपदि”
“सर्वांच्या साक्षी ने अग्नी ले फेरे घालते सात जन्मो जन्मांचे नाते जुळले मिळाली … रावांची साथ”
“मात्यापित्यांच्या छायेत फुलासारखी वाढले, आजच्या दिनी ….. च्या चरणावर जीवनपुष्प वाहिले.”
“मंगळसुत्राच्या दोन वाट्या, एक माहेरची एक सासरची खूण, …ची अर्धांगिनी जाहले, भाग्य कुठले याहुन.”
“मंगळसुत्राचे २ डोरले, एक सासर अन दुसरे माहेर, ……….रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर”