Rama Raghu Nandana Lyrics
“रामा रघुनंदना”
रामा रघुनंदना
आश्रमात या कधी रे येशिल, रामा रघुनंदना
मी न अहिल्या शापित नारी
मी न जानकी राजकुमारी
दीन रानटी वेडी शबरी
तुझ्या पदांचे अखंड चिंतन, ही माझी साधना
पतितपावना श्रीरघुनाथा
एकदाच ये जाताजाता
पाहिन, पूजिन, टेकिन माथा
तोच स्वर्ग मज, तिथेच येईल पुरेपणा जीवना
– ग. दि. माडगूळकर