Pola Wishes In Marathi
आपल्या अन्नदात्यासोबत राबणारा हा साथीदार, त्याच्याप्रती कृतज्ञता म्हणजेच “पोळा.
सर्व शेतकरी बांधवांना पोळ्याच्या शुभेच्छा
आज पुंज रे बैलाले,
फेडा उपकाराचं देनं..
बैला, खरा तुझा सन,
शेतकऱ्या तुझं रीन..
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..
आला रे आला बैल पोळा,
गाव झालं सारं गोळा..
सर्जा राजाला घेऊनि,
सारे जाऊया राऊळा..
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!
सण माझ्या सर्जा राजाचा,
ऋण त्याचं माझ्या भाळी,
सण गावच्या मातीचा..
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आज बैलाले खुराक
रांधा पुरनाच्या पोया
खाऊ द्या रे पोटभरी
होऊ द्या रे मगदूल
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!
कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव बैलपोळा,
सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा..!!
शिंगे घासली, बाशिंगे लावली,
मंडुळी बांधली, मोरकी आवळली..
तोडे चढविले, कासरा ओढला,
घुंगरूंमाळा वाजे खळाखळा..
आज सण आहे बैलपोळा..
पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…
मित्र आणि मैत्रीणीनों आज बैलपोळा आहे,
सर्वांना बैलपोळ्याच्या खुप खुप शुभेच्छा..
आपल्या महाराष्ट्राचा एक मोठा
आणि खास सण. आपल्या शेतकऱ्यांचा सण. आपल्यासाठी वर्षभर शेतात
घाम गळणाऱ्या बैलाचा सण.
Happy bail pola.
शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला,
आज शांत निजू दे.
तुझ्या घामानं फुलणाऱ्या पिकाला,
तुझ्या डोळ्यात सजू दे.
बैलपोळ्याच्या शुभेच्छा.!!