Pola Messages In Marathi
‘कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही’!
जगाचा पोशिंदा बळीराजा आणि त्याचा कष्टाचा सोबती बैल
यांच्यातल्या मैत्रीचं आणि प्रेमाचं प्रतीक म्हणजे “पोळा”
‘बैल पोळा’ सणाच्या सर्व शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा !!
आज बैलपोळा.. वर्षभर बळीराजाच्या
खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट
करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती
सदभावना व्यक्त करण्याचा दिवस..
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!
राबूनिया वर्षभर
करीतो एक दिवस आराम
माझ्या राजाचा सच्चा साथी
करीतो वंदना राजा
आज त्याच्या दैवताची!
संपलो जरी मी तरीही
तू धिर मात्र सोडू नकोस,
उजळेल पुन्हा दिस नवा
तू जगणे मात्र सोडू नकोस…
बैलपोळा निमित्त सर्वांना
हार्दिक शुभेच्छा.!!
दे वचन आम्हास आज दिनी
बैल पोळा,नको लावू फास
बळीराजा आपुल्या गळा,
बैल पोळ्याच्या
हार्दिक शुभेच्छा.!!
कष्ट हवे मातीला….
चला जपुया पशुधनाला..
बैल पोळ्याच्या
हार्दिक शुभेच्छा..!!
शेतकऱ्यांच्या मुकुंदा…
प्रपंच आमुचे उजाड अंगण,
तुझ्याच घामाने होते नंदनवन…
घे मनमुराद आज सजून,
भाजी भाकर गोड मानून,
होउदे आज पूर्ण तुझ्या साऱ्या इच्छा,
बैल पोळ्याच्या तुलाही
खूप खूप शुभेच्या.!!
वाडा शिवार सारं । वडिलांची पुण्याई।।
किती वर्णू तुझे गुण | मन मोहरून जाई ।।
तुझ्या अपार कष्टानं । बहरते सारी भुई ।।
एका दिवसाच्या पूजेनं । होऊ कसा उतराई ।।
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
बळीराजाचा मित्र तू
त्यांच्या डोक्यावरचं छत्र
हरपू न देणारा तू…
शेतकऱ्यांचा राजा तू
सुखातल्या क्षणांचा
गाजावाजा करून देणारा तू…
शेतकरी राजांच्या मातीची
पायाभरणी करून पिक
उत्पादन मिळवून देणारा तू…
कॄषिप्रधान लोकांना
रुबाबदार ऐट मिळवून
देणारा सर्जा राजा तू…