Modern Balgeet
“मॉडर्न बालगीत”
आई बाबांच्या हातात बसलंय कोण?
इटुकले पिटुकले मोबाईल दोन!
मीचमीच करती येता फोन
टिंगटाँग टिंगटाँग वाजती टोन!
झोपताना बोललो “बाबा सांगा ना गोष्ट”
बाबांनी दाखवली वाचून पोस्ट!
आई सोबत गेलो खायला कुल्फी,
तिथे पण बसली काढत सेल्फी!
आईचा पाहताच व्हाट्सअॅप डीपी,
बाबांचा भलताच वाढला बीपी !
आई बाबांच्या हातात बसलंय कोण?
इटुकले पिटुकले मोबाईल दोन!
😂😂😂
More Entries
- None Found