Merry Christmas Marathi Wishes For Friends
मेरी ख्रिसमसच्या शुभेच्छा मित्रपरिवारासाठी
ख्रिसमस माझ्यासाठी तो वेळ आहे जेव्हा माझ्या जवळच्यांना मी सांगू इच्छितो की, ते माझ्यासाठी किती खास आहेत. माझ्या सर्व फ्रेंड्सना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.
प्रिय मित्रा माझ्यासोबत आयुष्यातील सुंदर काळ घालवल्याबद्दल धन्यवाद. तुला ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. हा ख्रिसमसही एकमेकांसोबत साजर करूया. लेट्स पार्टी.
आला सांता आला घेऊन शुभेच्छा हजार
लहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि प्रेमाची बहार
तुम्हाला ही आनंदाचा जावो हा आनंदाचा सण वारंवार.
देवाकडे काय मागू तुझ्यासाठी, तुझ्या चेहऱ्यावर सदैव हास्य राहो हीच माझी मागणी मेरी ख्रिसमस.
तुझ्यासारख्या चांगल्या मित्राची आठवण ख्रिसमसला हमखास येते. आपण एकत्र घालवलेला काळ आठवतो आणि पुन्हा एकदा लहान व्हावसं वाटतं. मेरी ख्रिसमस माझ्या मित्रा.
तुझ्या आयुष्यातही ख्रिसमसची रात्र सुख समृद्धी आणो. तुझा आनंद नेहमी द्विगुणित होवो. मेरी ख्रिसमस मित्रा.
ख्रिसमसच्या निमित्ताने आपल्या आयुष्यातील चांगले क्षण आठवूया. जे मी आता मिस करतो. या ख्रिसमलाही एकच मागणं आहे. तुझा प्रत्येक ख्रिसमस आनंदी जावो.
तुझ्यासाठी विश करतो की, तुला या ख्रिसमसला सगळं मिळो, सुगंधी कँडल्स, ख्रिसमसचे कॅरोल्स आणि भरपूर गिफ्ट्स. मेरी ख्रिसमस.
माझ्या मित्रा तुला ख्रिसमसच्या खूप शुभेच्छा आणि हॅपी न्यू ईयर.