Aarogya Tips – आरोग्य टिपा Wishes For Facebook, Whatsapp, Pinterest, Instagram


Simple Tips For Cough Cold

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 5
Loading...

कफ खोकला वर साधे उपाय

“1) मध आणि मोसंब्याचा रस समप्रमाणात मिसळावा.

2) एक चहाचा चमचा मधात थोडी ब्रॅन्डी मिसळावी.

3) एक चहाचा चमचा मधात लसणीच्या रसाचे काही थेंब मिसळावेत.

4) एक चहाचा चमचा मधात एक कप द्रक्षाचा रस मिसळावा हे मिश्रण नेहेमी उपयोगी पडते.

5) एक चहाचा चमचा कांद्याच्या रसात एक चहाचा चमचा मध मिसळून हे मिश्रण ३ ते ४ तास तसेच ठेवून नंतर द्यावे. हे उत्तम कफ सिरप आहे.

6) बदाम रात्रभर भिजत घालून त्याची साल काढावी. या बदामाची पेस्ट थोडे लोणी आणि साखर यांच्याबरोबर घेतल्यास कोरड्या कफात उपयुक्त ठरते.

7) साखर खाल्ल्याने मोठ्या मुलांमध्ये कफ कमी होऊ शकतो.”

View More

Common Tips For Common Cold

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 10
Loading...

सामान्य सर्दी वर साधे उपाय

“1) कोरड्या आणि चोंदलेल्या नाकासाठी
साध्या क्षारयुक्त किंवा मीठ घातलेल्या पाण्याचे थेंब नाकात घालावेत. १/४ टेबलस्पून मीठ चार मिली पाण्यात घालून हे थेंब तयार करावेत. थोड्या-थोड्या दिवसांनी ताजे मिश्रण बनवावे आणि ते फ्रीजमध्ये ठेवावे. स्वच्छ ड्रॉपरने रोज ३ ते ४ वेळा दोन्ही नाकपुड्यांमध्ये २ थेंब घालावेत.

2) डॉक्टरांच्या सल्लाशिवाय औषधी युक्त ड्रॉप्स वापरु नयेत, कारण याच्या जास्त वापराने नाकाच्या श्लेष्मल आवरणाचा दाह होतो, आणि नाक सतत चोंदते.

3) थोडे लसणाचे तेल काद्यांच्या रसात मिसळून ते एक कप पाण्यात मिसळावे आणि त्यांचे थेंब नाकात घालावेत.
4) आल्याचा चहा किंवा १ चहाचा चमचा आल्याचा रस समभाग मधात घेतल्यास फायदा होतो.”

View More

Rutumana Pramane Aahar

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 5
Loading...

ऋतूमानाप्रमाणे आहार

“प्रत्येक ऋतूतील वातावरणाच्या बदलानुसार शरीरातील पचन व पोषण क्षमता कमी अधिक होत असते.त्यानुसार आहारात बदल न केल्यास अनेक व्याधिना बळी पडण्याची शक्यता असते.यासाठी आपण ऋतूनुसार आहार कसा घ्यावा ते बघुयात.
उन्हाळा –

1) सर्वप्रथम उन्हाळ्यातील आहार बघुयात. उन्हाळ्यात वातावरणातील उष्णतेमुळे शरीरातील पाणी व खनिजे यांचे प्रमाण कमी होत असते ते भरून काढण्यासाठी आहारातील द्रव पदार्थांचे प्रमाण वाढवावे लागते.

2) फळांचे सरबत,नारळपाणी,भाज्यांचे सूप याचे आहारातील प्रमाण वाढवावे तसेच दररोज ३ ते ५ लिटर. पाणी प्यावे.

3) उन्हाळ्यात भूक व पचन क्षमता दोन्ही मंदावलेल्या असतात त्यामुळे पचण्यास जड असे पदार्थांचे उदाहरणार्थ मासाहार ,उडीद .तेलकट ,मसालेदार पदार्थांचे सेवन करू नयेत.

4) कोकम,लिंबू सरबत ,डाळिंबाचा रस,फळामध्ये संत्री,मोसंबी यांचा वापर शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी व पाण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी करावा.अशाप्रकारे उन्हाळ्याचा आहार सेवन केल्यास उन्हाळ्यात आहार सुलभ होऊ शकतो.

हिवाळा –

1) आता आपण हिवाळा या ऋतूत आहार कसा असावा याबद्दल माहिती घेऊयात.

2) हिवाळ्यामध्ये वातावरणातील थंडीमुळे भूक व पचनक्षमता दोन्हीही वाढलेले असते त्यामुळे या ऋतूमध्ये पचण्यास जड पदार्थांचे सेवन देखील अनेक वेळा हानिकारक ठरत नाही.

3) ऋतूत थंडींचा त्रास होऊ नये यासाठी मसाल्याच्या पदार्थांपैकी जिरे,लसून,मोहरी,सुंठ यांचा आहातारतील वापर वाढवावा.

4) दही,दुध,अंडी यांचे सेवन करावे.

5) या ऋतूत भरपूर व्यायाम करावा.

6) गहू,ज्वारी, तांदूळ,बाजरी यांचे आहारातील प्रमाण वाढवावे.

7) सोयाबीन, डाळी,ड्राय फ्रुटचे प्रमाण वाढवावे.

पावसाळा-

1) पावसाळा या ऋतूत सततच्या पावसामुळे भूक मंदावलेली असते. परंतु पचन क्षमता ही उन्हाळ्यापेक्षा अधिक असते त्यामुळे या ऋतूत भूक वाढविण्यासाठी खारट व आंबट पदार्थांचा(लिंबू,लोणचे,चिंच) याचा आहारातील वापर वाढवावा.

2) फळांचा रस घेण्यापेक्षा नुसती फळे खावीत.

3) शक्यतो रस्तावरील उघडे (बाहेरील पदार्थ) टाळावेत आणि पाणी उकळूनच प्यावे जेणे करून दुषित पाण्याच्या संपर्कातून होणाऱ्या रोगांची लागण न होण्यास मदत होते.

4) आहारातील गोड पदार्थांचा समावेश वाढवावा.

अशा प्रकारे ऋतूमानानुसार आहारात बदल केल्यास व्याधी टाळता येऊ शकतात व शरीराला योग्य ते पोषण मिळण्यास मदत होऊ शकते.”

View More

Subscribe

Loading