Aajibai Cha Batwa Tips – आजीबाईचा बटवा टिपा Wishes For Facebook, Whatsapp, Pinterest, Instagram


Aayurvedik Kavita – आयुर्वेदीय कविता

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 5
Loading...

*आयुर्वेदीय कविता*

खोकून खोकून कोरडा झाला जर का *घसा।*
मधातून चाटा *हळद, ज्येष्ठमध आणि अडुळसा।।*

लागला मुका मार, सुजून पाय झाला असेल *गारद।*
लेपासाठी उगाळा *तुरटी, रक्त चंदन, आंबेहळद।।*

कोंड्याचा झाला आहे कां डोक्यामधे *साठा?*
केस धुतांना लावा *मेंदी, शिकेकाई, रिठा।।*

सकाळी सकाळी उठा देवाला करा तुम्ही *वंदन।*
उन्हाळ्यात थंडाव्यासाठी कपाळी लावा *चंदन।।*

उन्हामधे रापून चेहरा झाला कां सावळा *गडद?*
कांती उजळण्यासाठी दुधातून प्या थोडी *हळद।।*

बारीक आहे कुडी म्हणून होऊं नको तू *बावरी।*
दूध आणि साखरेबरोबर खा थोडी *शतावरी।।*

पिकला एक केस होईल डोक्यावर *चांदी।*
नैसर्गिक रंग आहे, केसांना लावा *मेंदी।।*

केसांना लावा *कचूर सुगंधी, मेंदी, जास्वंद।*
केस होतील लांब सडक, *सुगंध दरवळेल मंद ।।*

गाणं म्हणण्यासाठी झालां आहांत तुम्ही *अधीर।*
गोड मधुर आवाजासाठी खा *ज्येष्ठमध, शंगीर।।*

अशक्तपणामुळे तुमचा दुखतो आहे का *सांधा?*
शक्तीसाठी गायीच्या दुधातून प्या *अश्वगंधा।।*

पित्तप्रकोप झाला आहे, पोटातून येत आहेत कां *कळा?*
पोटात घ्या *आवळा, हिरडा, बेहडा म्हणजेच त्रिफळा।।*

वातामुळे पोटामध्ये होत आहेत कां *वेदना?*
खा *ओवा, सैंधव मीठ, आलं, लिंबू पुदिना।।*

संगणकावर काम करून थकली आहे कां *नजर?*
डोळ्यांसाठी खावे चांगले *पपई आणि गाजर।।*

लहान वयामध्येच ढोल मटोल झाला कां तुमचा *बेटा?*
जाडी कमी करण्यासाठी जरा कमी खा *बटाटा।।*

धूर धूळ प्रदूषणाचा झाला आहे आता *कळस।*
शुद्ध हवेसाठी झाडे लावा *कडूनिंब आणि तुळस।।*

छोटे छोटे आजार, बरं कां, घरच्या घरीच *हटवा।*
प्रत्येकाच्या घरी असूद्या *आजीबाईचा बटवा।।*
– कवी – सुरेश रघुनाथ पित्रे ,चेंदणी, ठाणे.

View More

Castor Oil Benefits in Marathi

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 10
Loading...

Castor Oil

एरंड चे आरोग्यवर्धक फायदे

“1) एरंड ही वनस्पती अशी आहे की आने, फुले, साल, मुळी व लाकूड सर्व काही अत्यंत उपयुक्त आहे. एरंडाचे कोळसेसुद्धा मसाल्यात घालण्यासाठी वापर करतात. आरोग्याच्या दृष्टीनेही सर्वात उपयुक्त असे हे एरंडेल.तिखट, उष्ण, प्रमेह, गोड, कडू अशा सर्व गुणांचा त्यात समावेश असतो.

2) एरंडाच्या सालीचा रस काढून त्या रसात दूध घालून ते दूध रोज प्यावे त्यामुळे कावीळ होत नाही.

3) भूक लागत नसेल, अस्वस्थता वाटते, अपचन झाले, पोटात दुखत असेल अशा वेळी एरंड मुळाचा काढा एक अष्टमांश करावा व त्यामध्ये हिंग, पादे लोण व सुंठीची पूड घालून चार सत्पके द्यावा.

4) कंबर दुखत असेल, खाली वाकता येत नसेल, चमक मारत असेल अशा वेळी वेली एरंडमूळ व सुंठ यांचा काढा करावा. या काढय़ामध्ये दोन ते तीन गुंजा जवखार घालून तो रोज घेत जावा याने कंबरदुखी थांबते.

5) हात, पाय, नाभी यांना सूज येते, सांधे ढिले पडतात. अशा वेळी एक कप ताजे गोमुत्र घ्या. त्यात दोन तोळे एरंडेल तेल घाला व दररोज प्या त्यामुळे जुलाब होऊन पोट साफ होईल.

6) कावीळसाठी सर्वात गुणकारी व उपयुक्त असे हे एरंडेला आहे त्यामुळे कशाप्रकारची पण कावीळ असो, लवकर बरी होते, तर घरच्या घरी करू शकतो आपण या बहुगुणी एरंडेलचा वापर.

7) एरंडमूळ वातशमनासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.
8) एरंडेल तेल तर कोठा साफ होण्यासाठी प्रसिद्ध आहेच.

9) एरंडाची पानेसुद्धा शेकासाठी, पंचकर्मातील वातशामक उपचारांसाठी वापरली जातात;

10) तसेच यकृताची कार्यक्षमता वाढविण्यासाठीसुद्धा उपयोगी असतात.”

View More

Lemon Grass Benefits in Marathi

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 5
Loading...

Lemon Grass

गवती चहा चे आरोग्यवर्धक फायदे

“1) आलं आणि गवती चहा घालून केलेला चहा अनेक छोट्या-मोठय़ा तक्रारींवरचा रामबाण उपाय आहे.
2) सर्दी, डोकेदुखी, अंगातली बारीक कणकण घालवण्यासाठी हा सर्वोत्तम उपाय म्हणावा लागेल.

3) गवती चहाला पातीचा चहा असेदेखील म्हणतात. याला एक विशिष्ट सुगंध असतो. घाम येऊन तापाचा निचरा होण्यासाठी गवती चहा विशेष गुणकारी आहे.

4) गवती चहा, सुंठ, मिरे आणि दालचिनी यांचा अष्टमांश काढा घेतल्याने सर्दी-पडसे, थंडी वाजून ताप येणे आदी विकार नाहीसे होतात.

5) तापात घाम येण्यासाठी गवती चहाचा वाफारा दिला जातो. हा वाफारा घेतल्यास ताप झटक्यात कमी होतो आणि अंगदुखी थांबते.

6) गवती चहापासून तेलही काढतात. हे तेल संधिवात आणि वाताने अंग दुखण्यावर अत्यंत गुणकारी आहे. हे दुखणे असणार्या व्यक्तींनी सकाळ-संध्याकाळ गवती चहाच्या तेलाने मालीश केल्यास संधिवात बरा होतो, अंगदुखी थांबते.

7) गवती चहा कॉलरावरचा प्रतिबंध करण्यासाठीदेखील वापरला जातो.”

View More

Tulsi Importance And Benefits in Marathi

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 10
Loading...

Tulsi

तुळस चे आरोग्यवर्धक फायदे

1) तुळस म्हणजे पवित्र आणि आयुर्वेदिक वनस्पती आहे रानातली हि तुळस परंतु तिच्या गुणांमुळेच तिला अंगणात जागा दिली जाते .

2) आपल्या देशात तुळशीला एवढे महत्त्व आहे कि ज्याच्या मुळे रोज तुळशीला पाणी घालणे ,पूजा करणे,प्रदक्षिणा घालणे अशा प्रकारे स्त्रिया रोजच तिची उपासना करतात . तसेच पुराणात देखील बराचसा उल्लेख केला आहे .

3) आयुर्वेदात तुळशीला फारच महत्त्वाचे स्थान आहे जसे अनशेपोटी तुळशीची २-३ पणे खाल्ल्यास स्मरणशक्ती वाढते ,शक्ती वृद्धिंगत होते ..दम ,खोकला ,कफ यासाठी तुळशीचा काढा घेतात .

4) तुळशीची पाने हि सर्वात नैसर्गिक व उत्तम औषध आहे व त्यासारखे दुसरे औषध नाही. कित्येक मोठ्या आजारांवरदेखील तुळशीपासून तयार केलेले औषध दिले जाते .”

View More

Subscribe

Loading