Tags: Smita Haldankar
काही मिळाले किंवा नाही मिळाले… तो नशिबाचा खेळ आहे… पण, प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल.
मला जे मिळू शकले नाही, त्याबाबत दु:ख करत राहण्याऐवजी, जे काही मिळाले आहे त्याबाबत मी आभारी असले पाहिजे. जग अधिक चांगले, सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल, तेव्हा ती संधी मी गमावता कामा नये.
आदर असेल त्यांच्या बद्दल प्रेम असणे जरूरी नाही … परंतु जर प्रेम असेल तर … त्यांच्या बद्दल आदर असणे फार महत्वाचे आहे.
जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाले नाही तर त्यांच्यावर रागावू नका, कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही त्याऐवजी ते तुमच्यासाठी जे चांगले आहे ते देतात.
जेव्हा तुम्हाला सर्वकाही तुमच्या विरुद्ध जाते आहे असं वाटत असेल तर लक्षात ठेवा की विमानालाही वर जाण्यासाठी वाऱ्याच्या विरुद्ध जावे लागते न की वाऱ्याच्या बरोबर.