“कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.”
Tags: Smita Haldankar
“आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन, हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो.”
“अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो.”
“कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे. परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजर्यात गुलाम बनून राहतो. म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचे विचार आणि स्वतःवर विश्वास ठेवा”
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
भरलेला खिसा माणसाला दुनियी दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.