“नाच रे मोरा अंब्याच्या वनांत नाच रे मोरा नाच !
ढगांशी वारा झुंजला रे काळाकाळा कापुस पिंजला रे आतां तुझी पाळी वीज देते टाळी फुलव पिसारा नाच !
Tags: Smita Haldankar
“ल ल्ला लला ललला ल ल्ला लला ललला
पप्पा सांगा कुणाचे ? पप्पा माझ्या मम्मीचे ! मम्मी सांगा कुणाची ? मम्मी माझ्या पप्पांची !
“येरे येरे पावसा तुला देतो पैसा.
पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा.
ये ग ये ग सरी माझे मडके भरी.
सर आली धावून मडके गेले वाहून.”
“ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ ही शर्यत रे अपुली
“अटक मटक चवळी चटक चवळी लागली गोड गोड जिभेला आला फोड फोड जिभेचा फोड फुटेना घरचा पाहुणा उठेना जिभेचा फोड फुटला घराचा पाहुणा उठला !!”
“आपडी थापडी गुळाची पापडी धम्मक लाडू तेल काढू.
तेलंगीचे एकच पान दोन हाती धरले कान.
चाउ माउ चाउ माउ पितळीतले पाणी पिउ हंडा पाणी गडप.”