Inspirational Shayari In Marathi – प्रेरणात्मक शायरी
सुखासाठी कधी हसावं लागंत ,
तर कधी रडावं लागतं,
कारण सुंदर धबधबा बनायला
पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं….
कळीसारखे उमलून फुलासारखे फुलत जावे
क्षणाक्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे
अश्रू असो कोणाचेही आपण विरघळून जावे
नसो कोणीही आपले
आपण मात्र कोणाचेही व्हावे!!
‘हे व्यक्तिमत्त्वाचे मोठेपण आहे,
फुले काही बोलत नाहीत ..
नाहीतर, काट्यांना चुरडून दाखवा … ‘
माझं आणि देवाचं एक सुंदर नातं आहे,
जिथे मी जास्त मागत नाही व
देव मला कधीच कमी पडू देत नाही.
अज्ञानाचा अंधकार जेवढा मोठा आहे,
तेवढेच मोठे ज्ञानदीप लावा.
सगळे जग हाच तुमचा देश आहे.
त्याचे रुप बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न करा.
चुकण हि ‘प्रकृती’,
मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि
सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं
पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं,
एक एक पाऊल पुढे टाकत चला
रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.
आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन,
निदान एक काम पूर्ण करीन,
निदान एक अडथळा ओलांडिन,
निदान प्रयत्न तरी करीनच करीन.
स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा;
इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.