Hartalika Teej Marathi Quote Picture
आला रे आाला हरतालिकेचा सण आला,
करुन पूजा हरतालिकेची मनोभावे,
शंकरासारखा मला पती मिळावा.
हरतालिका सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
Tags: Smita Haldankar
हरितालिका
हरितालिका म्हणजे जन्मोजन्मी शिव हाच पती मिळावा म्हणुन पार्वतीने केलेले एक व्रत आहे. विवाहित स्त्रिया आपल्याला अखंड सौभाग्य लाभावे व कुमारिका मुली चांगला पती मिळावा म्हणून हे व्रत करतात. विधवा स्त्रियाही या दिवशी केवळ उपवास करून पुढील जन्मी अहेवपण लाभावे म्हणून प्रार्थना करतात. हरतालिका व्रतात नदीतील वाळूची शिवपिंड तयार करून ती पूजतात. मातीच्या मूर्त्याही उपलब्ध असतात. मंगळागौरी व्रताप्रमाणेच या दिवशी कुमारिका व सुवासिनी मिळून रात्री जागरण करतात. दुसऱ्या दिवशी दहीभाताचा नैवेद्य दाखवून मूर्तीचे विसर्जन करतात.