Gruh Pravesh Ukhane
गृहप्रवेश उखाणे
“.माझ्या जीवनरुपी अंगणात काढीन रांगोळीच्या सुबक रेषा. … नी त्यात विविध रंग भरावे हीच माझी मनिषा.”
“आई ने वाढवले मैत्रिणीने घडवले ………. चं नाव घ्यायला ………. अडवले”
“आकाशाच्या प्रागंणात ब्रम्हा, विष्णु आणि महेश , ……च नाव घेवुन करते मि ग्रुह प्रवेश”
“उंबरठयावरचं माप पायांनी लोटते ……….– रावांच्या घरात भाग्याने प्रवेश करते”
“गीत गोविंदात श्रीकृष्णाने खेळीला राधेशी रास, …. चे नाव घेते सुनमुख प्रसंगी सासुबाई पुढे घातली धान्याची रास”
“गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट ……….– नाव घेते सोडा माझी वाट”
“गृहप्रवेश करतांना साठविले मायेचे मोती भरभर, ….. च्या हातात हात देउन झाले मी निर्भर”
“घराच्या पुढे अंगण अंगणात सजलाय बोगनवेल , प्रवेश करते गृहलक्ष्मी , वाजवून …च्या घराची बेल”
“चिवड्यात घालतात खोब्ररयाचे काप ………. रावां समवेत ओलांडते माप”
“माझ्या धान्याचे माप आज शिगोशीग भरले, म्हणून …….. रावांची मी सॉभाग्यवती झाले”
सागरावर चंदेरी लाट, ……….रावानच नाव घेते सोडा माझी वाट”
“शुभवेऴी शुभदिनी आली आमची वरात, … रावांचे नाव घेते, पहिले पाऊल घरात”
“सासु लावेल आई सरखि माया सासरे ठेवतिल आशिर्वादाचा हात …. सोबत संसार करण्यासाठी येवु द्या ना मला घरात “
“सासरे आहेत प्रेमळ, सासुबाई आहेत हौशी, …… चे नाव घेते प्रवेश करण्याच्या दिवशी.”
“सासू लावेल आई सारखी माया सासरे देतील आशिर्वादाचा हात …. सोबत संसार करण्यासाठी येवु द्या ना मला घरात “
“हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात ……….- बसले दारात मी जाऊ कशी घरात”
“हंसराज पंक्षी दिसतात हौशी, ……….रावाचे नव घेते सत्यनारायनाच्या दिवशी”
“हिरव्या शालुला जरिचे काठ…. चे नाव घेते, सोडा माझी वाट”
“…… लेक, झाले ….सुन् ..चे नाव घेते ग्रुह्प्रवेश करुन्… “
“ग्रहप्रवेश करतांना साठविले मायेचे मोठी भरभर, …….च्या हातात हात देऊन झाले मी निर्भर “
“शुभवेऴी शुभदिनी आली आमची वरात, … रावांचे नाव घेते, पहिले पाऊल घरात “