Gamatidar Ukhane
गमतीदार उखाणे
“….._ रावांनी लग्नात उडवल्या हजारांच्या नोटा कारण त्यांचा बाप आहे मोठा … होऊ दे तोटा”
“Facebook वर ओळख झाली Whatsapp वर प्रेम जुळले … राव आहेत खरच बिनकामी हे लग्न झाल्या नंतरच कळले”
“आज आहे शनिवार उद्या येईल रविवार …
__ ची करते संसार घडवू सुखाचा परिवार”
“आला आला उन्हाळा । संगे घामाचा ह्या धारा … …
_ रावांचे नाव घेते लावून AC चा थंड वारा”
“इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाच कवर …..X…. याचं नाव घेते ..Y …रावांची लवर “
“इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय, … घरी परतले नाहीत अजुन, कुठे पिऊन पडलेत की काय!!!”
“ईन मीन साडे तीन … ईन मीन साडे तीन … ………._ माझा राजा …. मी झाले त्याची QUEEN !”
“केळीच्या पानावर् पाय् ठेवु कशी लग्न नाही झाल तर नाव घेउ कशी”
“केस झाले पांढरे.. जवळ आली चाळीशी तरी पण प्रेम करणे कधी नाही थांबत ………….राव आहेत खूप हौशी ….”
“कॉरव-पांडव युध्दात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी, …… आहेत फार निस्वार्थी”
“गाडीत गाडी डेक्कन क्वीन ……… आहे माझी ब्युटी क्वीन”
“गुलाबाच्या झाडावर लागतात काटे अणि फुले गुलाबाच्या झाडावर लागतात काटे अणि फुले ………. रावांशी लग्न करताच झाली मला ४ मुले”
“चंदनी पानात मुग्ध कळी हसली …रावांच्या प्रेमात मी नकळत फसली”