Festival Ukhane ( सणवार उखाणे )
“…च्या पूजेला जाई-जुईच्या राशी, …च नाव घेत हळदी-कुकवाच्या दिवशी”
“अंबाबाई च्या देवळात हळदी कुंकुवाच्या राशी ……………रावांच नाव घेते मंगळागौरी च्या दिवशी ”
“अधिकमासात आईने दिली चांदिची परात, सखींनो २७ फेब्रुवारीला …. ची आली होती हत्तीवरुन वरात.”
“अर्धनारी नटेश्वराच्या मुर्तीप्रमाणे पति पत्नीच्या एकरुपतेने बनत असतो संसार, ….. चे नाव घेते आज आहे श्रावणी सोमवार.”
“अश्वीन प्रतिपदेला देवीचे बसता घट, ….. नी आमलाय माझ्याकरिता सोंगतट्यांचा पट.”
“आज आहे श्रावणी पोळा, ….. च्या जीवावर शृंगार केले सोळा.”
“आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते कुजन सौ…..सोबत करतो मी लक्ष्मीपुजन !!!!!”
“उखाणा घेउन भगिनिंच्या सुप्तगुणांना मिळतो वाव, आज आहे मंगळागॉरी ….. चे घेते मी नाव.”
“जेजुरीचा खन्डोबा तुळ्जापुरची भवानी ….रावाची आहे मी अर्धागीनी”
“नागपंचमीच्या सणी सख्या पुजती वारुळाला ……….– रावांविना शोभा नाही वैभवाच्या देऊळाला”
“नवरात्रीनंतर येतोय दसरा, …..चा चेहरा नेहमी असतो हसरा.”
“धरतीताईने आकाशाला राखी बांधुनी जोडीले बंधुत्वाचे नाते, ….. च्या सोबत मी अमरप्रेमगीत गाते”
“धनत्रयोदशीला करतात धनाची पुजा, ….. च्या जीवावर करते मी मजा.”
“दिवाळीच्या सणाला दिव्यांच्या पंक्ती ……….– रावांना ओवाळते मंगल आरती”
“नारऴीपौर्णिमेला करतात नारऴीभात, …सह फेरे खाल्ले सात”
“पुण्यकर्म केले असता राहतात जन्मोजन्मीच्या गाठी, … चे नाव घेऊन जाते मी ग़ौरीहर पुजनासाठी”
“पुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय ‘ मोरुची मावशी ‘ , …….. चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.”
“भाऊबहिणीच्या प्रेमाचे प्रतिक आहे रक्षाबंधन, ….ना करीते मी रोजच वंदन.”
“भाद्रपद महिन्यात गोकुळ अष्टमीला पाळणा हलला श्रीकृष्णाचा, ….. चे नाव घेऊन निरोप घेते माहेरचा.”
“नागपंचमीला घरोघरी होते पुरणपोऴी, …..नी आणली माझ्याकरिता कटकीची चोऴी”
“मंगळसुत्राच्या दोन वाट्या, एक माहेरची एक सासरची खूण, …ची अर्धांगिनी जाहले, भाग्य कुठले याहुन.”
“माझ्या जीवनरुपी अंगणात काढीन रांगोळीच्या सुबक रेषा. … नी त्यात विविध रंग भरावे हीच माझी मनिषा.”
“माहेश्वरी समाजात ऋषिपंचमीला बहिण भावाला राखी बांधुन करते भावाची आरती, ….. ची आहे माझ्यावर खरीखुरी प्रिती.”