Dr. Ambedkar’s Mahaparinirvan Din Quotes In Marathi
लोकांनी सत्याच्या मार्गावर चालावे यासाठी बनले ते मार्गदर्शक
वेळप्रसंगी योग्य वाट दाखविण्यासाठी बनले त्यांचे दिशादर्शक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारत अनेकांना या धर्माची दीक्षा दिली.
दरम्यान भारतातील अनुसूचित जाती, जमातींच्या लोकांना सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक
स्तरावर सक्षम करण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी भरीव कामगिरी केली आहे.
या दिवसाचं औचित्य साधत त्यांच्या त्यांना आदरांजली अर्पण करा.
मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची,
तू जगाला शिकवली व्याख्या
माणसातल्या माणुसकीची..
तू देव नव्हतास,
तू देवदूतही नव्हतास,
तू मानवतेची पूजा करणारा
खरा महामानव होतास…
महासूर्याला अभिवादन!
न्याय मिळवुन देण्यासाठी तो रात्रंदिवस झुरला..
दलितांच्या अंधाऱ्या दुनियेत तो एकटाच सुर्य ठरला..
“अरे गर्वाने देतो आम्ही त्याला देवाची जागा”
कारण एका महाराचा मुलगा,
अवघ्या 33 कोटींना पुरला..
महापरिनिर्वाणदिनी महामानवास,
विनम्र अभिवादन्!
प्राणाची आहुती दिली, आमच्या जीवनासाठी..
त्रास भोगला किती, आमच्या हसण्यासाठी..
कसे विसरू बाबा तुमचे उपकार,
हा जन्म वाहिला मी फक्त तुमचे गुणगान गाण्यासाठी..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिना निमित्त,
विनम्र अभिवादन !