Dhanteras Messages In Marathi
आला आला दिवाळीचा सण, घेऊनि तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण,
दिव्यांनी उजळून निघाली सृष्टी, धन्वंतरीची कायम राहो तुम्हावर कृपादृष्टी.
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
उटण्याचा नाजूक सुंगध घेऊन,
आली आली दिवाळी पहाट,
पणतीतल्या दिव्यांच्या तेजाने उजळेल आयुष्याची वाट…
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा
धन्वंतरी देवता आपणावर सदैव प्रसन्न राहो
आणि आपणास सुखी व आरोग्यदायी जीवन लाभो…
हिच ईश्वरचरणी प्रार्थना….
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
रांगोळीच्या रंगात आयुष्य रंगू दे,
दिवाळीच्या दिव्यांसारखे तेजाने उजळू दे,
धन आणि आरोग्याची साथ लाभू दे…..
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं सत्सम्वत्सरं दीर्घ मायुरस्तु अमृतमयी मंगलमय हो
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
फटाके, कंदील आणि पणत्यांची रोषणाई,
चिवडा -चकली लाडू करंजीची लज्जत न्यारी,
नव्या नवलाईची दिवाळी येता आनंदली दुनिया सारी…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
चिमूटभर माती म्हणते मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणतो मी होईन वाती,
थेंबभर तेल म्हणते मी होईन साथी…
ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती…
अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
लक्ष दिव्यांचे तोरण ल्याली, उटण्याचा स्पर्श सुंगधी,
फराळाची लज्जत न्यारी, रंगावलीचा शालू भरजरी,
आली आली हो दिवाळी आली…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
घेऊनि दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
माळोनी गंध मधूर उटण्याचा, करा संकल्प सुंदर जगण्याचा.
गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा….
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!