दत्त जयंती
मार्गशीर्ष पौर्णिमा ही तिथी श्रीदत्त जयंती म्हणून साजरी करतात. श्री. दत्तात्रय हे अत्रीऋषी व माता अनसूया यांचे पुत्र होय. तीन तोंडे, सहा हात, दोन पाय, चतुर्वेद दर्शक चार श्वान व जवळ कामधेनु (गोमाता) असे असलेले श्री. दत्तगुरू हे बह्मा, विष्णु, महेश यांचे अंश होय. श्री. गुरूदेव दत्त हे हिदु धर्मातील पहिले गुरू होय. हिंदु धर्माचा प्रसार करण्याच्या उद्देशाने दत्तात्रयांनी भारत भम्रण केले ठिकठिकाणी त्यांची स्थाने निर्माण करून गुरू परंपरा चालू ठेवली.
आपल्या शिष्यामार्फत दीनदलितांची सेवा व समाजातील दु:ख व अज्ञान दूर करण्याचे कार्य चालू ठेवले. त्यांच्या पश्चात श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वती व वासुदेवानंद सरस्वती हे त्यांचे अवतार मानण्यात येतात. दत्ताची स्थाने महाराष्ट्रात प्रयाग, औदुंबर, गाणगापुर, माहुर, नृसिंहवाडी आदि आहेत. दत्तांच्या कार्यावर लिहिलेले गुरूचरित्र हा ग्रंथ संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. मोठ्या भक्तिभावाने वाचला जातो.