Dattatreya Jayanti Wishes Images ( दत्तात्रेय जयंती शुभेच्छा इमेजेस )

Dattguru Jayanti Message Picture
आत्मसुखाचा मोक्ष लुटाया, अमोल ठेवा हाती धरा,
दत्तचरण माहेर सुखाचे, दत्तभजन भोजन मोक्षाचे.
दत्तगुरु माऊलीचा आशिर्वाद तुम्हा सर्वांवर कायम असाच राहो
आणि तुमचे आयुष्य सुखात जावो ही सदिच्छा!

Dattguru Jayanti Wish In Marathi
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः
गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः
दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणा सर्वांना हा दिवस अत्यंत पवित्र आणि मंगलमय जावो ही सदिच्छा!

Happy Dattguru Jayanti Message Image
दत्तगुरुंचे नाम स्मरा हो, दत्तगुरुंचे भजन करा,
हे नामामृत भवभयहारक, असंहारक त्रिभुवनतारक.
दत्त जयंतीच्या मंगलमय दिवशी आपण सर्वांना
आयुष्यात येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळो
आणि आपल्या आयुष्यात काय सुखसमृद्धी येवो ही सदिच्छा!

Dattguru Jayanti Quote Photo
दिगंबरा दिगंबरा..श्री दत्तगुरु दिगंबरा..
विश्वंभर औदुंबरा..दयाघना हे करूणाकरा..!!
सर्वांना दत्त जयंतीच्या मनःपूर्वक आणि मंगलमय शुभेच्छा!
धावत येसी भक्तांसाठी, ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा!!
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा
दत्तगुरूंचे नाम स्मरा हो दत्तगुरूंचे भजन करा
हे नामामृत भवभयहारक अघसंहारक त्रिभुवनतारक
आत्मसुखाचा मोक्ष लुटाया अमोल ठेवा हाति धरा
दत्तचरण माहेर सुखाचे दत्तभजन भोजन मोक्षाचे
कवच लाभता दत्तकृपेचे कळिकाळाचे भय न जरा
हा उत्पत्ति-स्थिति-लयकर्ता योगज्ञान-उद्गाता, त्राता
दत्तचरित मधु गाता गाता भवसागर हा पार करा
सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Datta Chi Aarti Lyrics
।। श्री दत्ताची आरती ।।
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा।
नेती नेती शब्द न ये अनुमाना।
सुरवर मुनिजन योगी समाधि न ये ध्याना॥
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता।
आरती ओवाळीतां हरली भवचिन्ता॥
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त।
अभाग्यासी कैसी न कळे ही मात।
पराही परतली तेथे कैचा हेत।
जन्ममरणाचा पुरलासे अन्त॥
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता।
आरती ओवाळीतां हरली भवचिन्ता॥
दत्त येऊनियां ऊभा ठाकला।
सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला।
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला।
जन्ममरणाचा फेरा चुकविला॥
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता।
आरती ओवाळीतां हरली भवचिन्ता॥
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान।
हरपलें मन झालें उन्मन।
मी तू पणाची झाली बोळवण।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान॥
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता।
आरती ओवाळीतां हरली भवचिन्ता॥
“ब्रम्हा विष्णू आणि महेश, सामोरी बसले”
ब्रम्हा विष्णू आणि महेश, सामोरी बसले
मला हे दत्त गुरु दिसले || धृ ||
माय उभी हि गाय होवुनी, पुढे वासरू पाहे वळूनी
कृतज्ञेतेचे श्र्वान बिचारे पायावर झुकले || १ ||
चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराचे
घुमटा मधुनी हृदय पाखरू, स्वानंद फिरले || २ ||
तुम्हीच केली सारी किमया, कृतार्थ झाली माझी काया
तुमच्या हाती माझ्या भवती, औदुंबर बसले || ३ ||
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
दत्तश्रीगुरूंचे करुया ध्यान वंदू चरण प्रेमभावे.
ब्रह्मा विष्णू महेश एकत्र आले
मन हे न्हाले भक्ती डोही.
अनुसया उदरी धन्य अवतार
केलासे उद्धार विश्वाचा या.
माहुरगडावरी सदा कदा वास
दर्शन भक्तास देई सदा
चैतन्य झोळी विराजे काखेत
गाईच्या सेवेत मन रमे.
चोविस गुरूचा लावियला शोध
घेतलासे बोध विविधगुणी.. .
।दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।
ॐ श्री गुरुदेव दत्त.
दत्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा .
🌹🌹शुभ प्रभात🌹🌹
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
।दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।
ॐ श्री गुरुदेव दत्त.दत्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा .
“नमन माझे गुरुराया”
नमन माझे गुरुराया |
महाराजा दत्तात्रया || धृ ||
तुझी अवधूत मूर्ती
माझ्या जीवीची विश्रांती || १ ||
माझ्या जीवीचे साकडे
कोण निवारील कोडे कोडे || २ ||
माझ्या अनुसूया सुता
तुका म्हणे पाव आता || ३ ||