Common Tips For Common Cold


सामान्य सर्दी वर साधे उपाय

“1) कोरड्या आणि चोंदलेल्या नाकासाठी
साध्या क्षारयुक्त किंवा मीठ घातलेल्या पाण्याचे थेंब नाकात घालावेत. १/४ टेबलस्पून मीठ चार मिली पाण्यात घालून हे थेंब तयार करावेत. थोड्या-थोड्या दिवसांनी ताजे मिश्रण बनवावे आणि ते फ्रीजमध्ये ठेवावे. स्वच्छ ड्रॉपरने रोज ३ ते ४ वेळा दोन्ही नाकपुड्यांमध्ये २ थेंब घालावेत.

2) डॉक्टरांच्या सल्लाशिवाय औषधी युक्त ड्रॉप्स वापरु नयेत, कारण याच्या जास्त वापराने नाकाच्या श्लेष्मल आवरणाचा दाह होतो, आणि नाक सतत चोंदते.

3) थोडे लसणाचे तेल काद्यांच्या रसात मिसळून ते एक कप पाण्यात मिसळावे आणि त्यांचे थेंब नाकात घालावेत.
4) आल्याचा चहा किंवा १ चहाचा चमचा आल्याचा रस समभाग मधात घेतल्यास फायदा होतो.”

More Entries

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading