Anti Tobacco Slogans (तंबाखू निषेध घोषवाक्य)
तंबाखू निषेध घोषवाक्य
नाही म्हणा तंबाखुला, सुखी राही संसार आपला.
तंबाखू खावून नको मारू पिचकारी,
घाणेरडा म्हणतील लोकं तुला सारी.
व्यसना मागे पळु नका, तंबाखू मळु नका.
तंबाखूचा विडा,पहिला सोडा.
बसु नका तंबाखू खात, होईल आयुष्याचा घात.
तंबाखूची पुडी, जणू विषाची फडी.
करू नका तंबाखूचे सेवन, कॅन्सरपुढे आत्मसमर्पण.
तंबाखू ची नशा करी अनमोल जीवांची दुर्दशा.
तंबाखूला ज्याने कवेत घेतले, त्याने मृत्यू जवळ आणले.
घ्याल तंबाखूची साथ तर आयुष्य होईल बरबाद.
समाजात कमी होईल सन्मान, थुंकू नको खावून पान,
संस्कार,संस्कृती विसरू नको, तंबाखूसाठी हात पसरू नको.
बंद करा बंद करा तंबाखूला हद्द पार करा
तंबाखू सोडा, जीवनाशी नाते जोडा.
तंबाखू सोडा, कर्करोग टाळा.
तंबाखू सोडा, आरोग्य पाळा.
जो करील धूम्रपान, त्याचे जीवन होईल घाण.
जो टाकेल तंबाखू चे सेवन, त्याचे जीवन बनेल एवं.
तंबाखू खाणार, जीवन घालवणार.
नको कण तंबाखूचा, एक क्षण जीवनाचा.
तंबाखूचा घास, जीवनाचा नाश.
नका करू धूम्रपान, होईल जीवन सुंदर आणि छान.
जाहिरातींना बळी पडू नका, तंबाखू-गुटका सेवन करू नका.
एकमेकांना साहाय्य करू, तंबाखूला दूर ठेवू.
तंबाखू, सिगरेट नेलेला माणसाचा घात, माणूसच करेल त्यावर मात.
सोडा तंबाखूची असं, धरा सुंदर जीवनाची आस.
तंबाखू खाणे हा नव्हे टाईमपास, हा तर जीवनाला गळफास.
सशक्त भारताचा एकच नारा, तंबाखूला देऊ नका थारा.
अर्थ आणू जीवनाला, विसरून जाऊ तंबाखूला.
तंबाखू सोडा आणि भारत जोडा.
जीवनात संयम पाळा, तंबाखू खाणे प्रत्येकाने टाळा.
तंबाखूची थोडीशी मजा, जीवनाला कायमची सजा.