Aathvan Shayari In Marathi – आठवण शायरी
अनेक जण भेटतात..
खूप जण आपल्या जवळ येतात
आणि दुरावतात ही…
अनेक जण आपल्याला शब्द देतात
आणि विसरतात ही…
सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते..
शेवटी आपण एकटेच असतो
आणि..
सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.
आजही मला, एकटच बसायला आवडत…
मन शांत ठेवून,
आठवणींच्या विश्वात रमायला आवडत…
दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला,
तुला ही जमतं का गं,
माझ्या आठवणीत रमायला…
प्रत्येक फूल देवघरात वाहिले जात नाही,
तसेच प्रत्येक नातेही मनात जपले जात नाही,
मोजकीच फुले असतात देवाच्या चरणी शोभणारी,
तशी मोजकीच माणसे असतात क्षणों क्षणी आठवणारी…
खूप जण आपल्या जवळ येतात
आणि दुरावतात ही…
अनेक जणआपल्याला शब्द देतात
आणि विसरतात ही…
आठवणी हसवतात… आठवणी रडवतात…
काहीच न बोलता आठवणी निघून जातात…
तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात
तुझ्यासाठी जागलेल्या रात्रींचा,
हिशोब कधीच मांडणार नाही..
तू येशील किंवा नाही,
हट्ट कधीच धरणार नाही..
जर नाहीच आलीस तू कधी,
तुझ्या आठवणीत जगण्याचा,
छंद मात्र मुळीच मी सोडणार नाही…
सत्याच्या वाटेवर स्वप्न तुटून जातात,
निसर्ग बदलला की फुले सुकून जातात,
मनापासून आठवण काढली आहे तुमची,
पुन्हा म्हणू नका आपली माणसेच विसरून जातात….!
सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते..
शेवटी आपण एकटेच असतो
आणि..
सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.
गोड आठवणी आहेत
तेथे हळुवार भावना आहेत..
हळुवार भावना आहेत
तेथे अतुट प्रेम आहे.. आणि
जिथे अतुट प्रेम आहे
तेथे नक्कीच.. तू आहेस…..
तुझी आठवणच फक्त उरली आहे,
त्या आठवणीतही तू माझीच आहेस,
आजही वाट पाहतो तू परत येण्याची,
कारण,
त्या घराची राणी फक्त तूच आहेस…
तुझी आठवण माझ्या मनीची साठवण,
विचलित होते मन जेव्हा,
आठवतो तो अखेरच्या भेटीचा क्षण..
नसे कोणी संगती सोबती.. उडून गेले सारे पक्षीगण..
घरटे माझे सुनेच.. अन सोबतीला फक्त आठवण…!!
आयुष्यात खूप सारे जण येतात जातात्……
प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं नसतं…….
पण जे आपल्या सुख दुःखात सामील होतात……..,
त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यत विसरायचं नसतं…
“डोळ्याना सांगीतलय मी,
आज रात्र जागायची आहे…..
ऐकलय की,
तुझी आठवण येणार आहे.”
वाट पाहशील तर आठवण बनून येईन,
तुझ्या ओठावर गाणे बनून येईन,
एकदा मनापासून मला आठवून तर बघ,
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन…
तुझ्यात आणि माझ्यात कुठे दुरावा आहे,
आठवण तिकडे आणि उचकी इकडे
हाच आपल्या प्रेमाचा मोठा पुरावा आहे…
तिचं कामच आहे आठवत राहणे,
ती कधी वेळ काळ,
बघत नाही, तिला वाटते तेव्हा येऊन जाते,
कधी हसवते तर कधी रडवून जाते.
असे माझे विरह प्रेम..!
तिचं कामच आहे आठवत राहणे,
ती कधी वेळ काळ, बघत नाही,
तिला वाटते तेव्हा येऊन जाते,
कधी हसवते तर कधी रडवून जाते.
असे माझे विरह प्रेम.
पाऊस यावा पण,
महापूरासारखा नको..
वारा यावा पण,
वादळासारखा नको..
आमची आठवण काढा पण,
आमावस्या – पोर्णिमासारखी नको…
तु खुप दूर आहेस पण तुझा भास तर आहे,
एकाकी का असेना जगण्याची आस तर आहे,
तु खुप दूर आहेस पण तुझी आठवण तर आहे,
माझ्या हृदयात तुझ्या प्रेमाची साठवण तर आहे…
तुझ्या सुंदर आठवणीत
अश्रुंचाही विसर पडतो.
आठवणीतुन परतताना हा
अश्रुच मग साथ देतो.
दिवस ही पुरत नाही तुझी
आठवण काढायला,
तुला ही जमत का गं माझ्या
आठवणीत रमायला….
जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील ,
एकत्र नसलो तरी सुगन्ध दरवळत राहील,
कितीही दूर गेलो तरी मैत्रीचे हे नाते ,
आज आहे तसेच उद्या राहील.
तुझी आठवण आल्यावर,
कधी येते हसायला कधी येते रडायला,
तर कधी कधी असं वाटतं,
की Direct यावं तुला भेटायला…
विसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही !
दिवस येतात जातात पण मन कुठच लागत नाही !
पाऊस पडून गेला तरी आठवणीँचे आभाळ मोकळं होत नाही !
आठवण आली नाही असं कधी झालच नाही !
आठवायला विसराव लागत विसरता मात्र आलच नाही..
रोज तुझी आठवण येते,
आणि डोळ्यांत पाणी उभं राहतं..
तू जवळ हवीस असं वाटतांना,
खूप दूर आहेस हे
सांगून जातं…
आजही मन माझे खूप उदास,
अजून होतो तुझ्या त्या,
आठवणींचाच आभास..
होत नाही आजही विश्वास,
खरंच तुझ्यात गुंतला आहे माझा श्वास…!
मोगरा कितीही दूर असला तरी
सुगंध आल्याशिवाय राहात नाही ,
तसेच आपली माणस कितीही दूर
असली तरी आठवण आल्याशिवाय राहात नाही !
प्रेमाच्या या प्रेमळ हृदयात,
आज अचानक धडधड झाली,
डोळे भरले पाण्यानी आणि
पुन्हा तुझी आठवण आली..
का मला आज तुझी इतकी आठवण येतेय,
तू लांब असून पण जवळ असल्याचा भास होतो…
जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील ,
एकत्र नसलो तरी सुगन्ध दरवळत राहील,
कितीही दूर गेलो तरी मैत्रीचे हे नाते ,
आज आहे तसेच उद्या राहील.
आठवण त्यालाच येते,
जो आपली काळजी करत असतो,
नाही तर Timepass करणाऱ्यांना,
Message बघायलाही वेळ नसतो…
आठवणी हसवतात, आठवणी रडवतात,
काहीच न बोलता आठवणी निघून जातात,
जेव्हा कोणीच नसते सोबत तेव्हा मनात गर्दी करतात,
आणि गर्दीत असतांना माणसांच्या मग मात्र एकटेच ठेवतात…
आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात!