Aata Bola Mukhane Hari Nam Jai Jai Ram
“आता बोला मुखाने हरि नाम जय जय राम “
आता बोला मुखाने हरि नाम जय जय राम
आता बोला मुखाने जय जय राम, जय जय राम जय जय राम
आता तरी बोला मुखाने जय जय राम || धृ ||
राम नामाने वाल्या कोळी तरला, वाल्याचा वाल्मीकी झाला
ऐसे हरिनामाचे काम…. जय जय || १ ||
राम नामाने अघटित घडले, पाण्यावरती पाषाण तरले
ऐसे हरिनामाचे काम…… जय जय || २ ||
एकाजनार्दनी राम नाम, उद्धरिले भाविकात
ऐसे हरिनामाचे काम ….. जय जय || ३ ||
Leave a comment