Aala Vasant Rutu Aala
आला वसंत ऋतु आला
वसुंधरेला हसवायाला
सजवित नटवित लावण्याला
आला, आला वसंत ऋतु आला
रसरंगाची करीत उधळण
मधुगंधाची करीत शिंपण
चैतन्याच्या गुंफित माला रसिकराज पातला
वृक्षलतांचे देह बहरले
फुलाफुलांतून अमृत भरले
वनावनांतून गाऊ लागल्या पंचमात कोकिळा
व्याकुळ विरही युवयुवतींना
मधुर काल हा प्रेममिलना
मदनसखा हा शिकवी रसिका शृंगाराची कला