Aai Marathi Charoli Images – आई मराठी चारोळी
मायेन भरलेला
कळस म्हणजे आई,
मायेन विसावा देणारी
सावळी म्हणजे आई
असेन जर मजला,
मानव जन्म कधी
आई तुझ्याच पोटी,
पुन्हा जन्मावेसे वाटते
पूर्वजन्माची पुण्याई असावी
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिलं नव्हतं तरी
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला
आई तुझ्या कुशीत,
पुन्हा यावेसे वाटते
निर्दयी या जगापासुन,
दुर जावेसे वाटते..
आई, करोडोंन मध्ये जरी हरवलो
तरी तू मला शोधून काढशील
आई, तुला एकदाच हाक दिली
तरी अब्जांनी धावून येशील.
आई, हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचे ऋण फीटणार नाही
आई, लाख चुका होतील मज कडून
तुझं समजावनं मिटणार नाही
आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम
हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी
कितींदा नव्या हृदयाचा संदेश
देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी
शोधून मिळत नाही पुण्य
सेवार्थाने व्हावे धन्य
कोण आहे तुजविण अन्य?
‘आई’ तुजविण जग हे शून्य..
एकदा जरासं कुठे खरचटलो
आई, किती तू कळवळली होतीस
एक धपाटा घालून पाठीत
जख्मेवर फुंकर घातली होतीस
आई, तुझ्या रागवण्यातही
अनूभवलाय वेगळाच गोडवा
तुझ्या मायेच्या नित्य नव्या सणात
फिका पडतो दसरा नि पाडवा
आई ,तुझ्यापुढे ही
माझी व्यथा कशाला ?
जेव्हा तुझ्यामुळे ह्या
जन्मास अर्थ आला…
आई, तुझ्यापुढे मी
आहे अजून तान्हा
शब्दात सोड माझ्या
आता हळूच पान्हा…